’शेत हसल’ काय आहे?

स्वयं टॉक्स आणि ॲग्रोवन सहर्ष सादर करत आहेत - ‘शेत हसल !’ शेतकरी आणि शेती विषयात विशेष आवड असणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरेल असा एक खास कार्यक्रम !

शेत हसल ’ शेत हसल हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर भारतीय शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत नवनिर्मिती करत प्रगती कशी साधायची याचे दर्शन घडवणारे हे व्यासपीठ आहे.

’स्वयं टॉक्स’ बद्दल थोडं:

स्वयं टॉक्स हे एक अनोखे व्यासपीठ आहे जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान, कला आणि संस्कृती, व्यवसाय, पर्यावरण, समाजसेवा, क्रीडा आणि साहस आणि शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य व्यक्ती त्यांच्या प्रेरणादायी कल्पना व जीवनप्रवास प्रेक्षकांसोबत शेअर करतात. या प्लॅटफॉर्मचे वेगळेपण स्पीकर्सच्या नेटक्या व प्रभावी सादरीकरणात तसेच त्यांच्या सखोल व आकर्षक पद्धतीने घेतलेल्या मुलाखतींमध्ये आहे. यासाठी मल्टीमीडियाची घेतलेली मदत संपूर्ण अनुभव समृद्ध आणि अविस्मरणीय बनवते!

कार्यक्रमाचा तपशील

दिवस पहिला

१२ डिसेंबर २०२४

नोंदणी : दुपारी 4:00 वाजेपासून
४.३० ते ५.३०

विषय : ग्रामीण भागातील शेतीचा विकास

सहभाग
५.३० ते ६.३०

विषय : शेती विकासासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा?

सहभाग
दिवस दुसरा

१३ डिसेंबर २०२४

नोंदणी : दुपारी 4:00 वाजेपासून
४.३० ते ५.३०

विषय : शेतीच्या विकासासाठी शासकीय व खाजगी संस्थांच्या योजना

सहभाग
५.३० ते ६.३०

विषय : पानी फाऊंडेशनने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात परिवर्तन कसे घडवले?

सहभाग
दिवस तिसरा

१४ डिसेंबर २०२४

नोंदणी : दुपारी 4:00 वाजेपासून
४.३० ते ५.३०

विषय : Organic पद्धतीने शेती

सहभाग
५.३० ते ६.३०

विषय : सह्याद्री फार्म्स - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ग्लोबल झेप

सहभाग

* अपवादात्मक परिस्थितीत कार्यक्रम व सहभागी पाहुणे बदलू शकतात.